नागपूर हिवाळी अधिवेशनात (१४ डिसेंबर, ११:१५ वा.) आमदार नाना पटोले यांनी पीएचडी विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. शिष्यवृत्तीसाठी 'इतरत्र काम करू नये' अशी अट असतानाही अनुदान मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ही योजना सुरू ठेवायची असल्यास, निधी उपलब्ध करून शिष्यवृत्ती त्वरित नियमित करावी, अशी मागणी करत पटोले यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.