यवतमाळ: लोहारा पोलीस स्टेशन हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजाविक्री करणाऱ्या इसमावर कारवाई
लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अजनेय सोसायटी वाघापूर येथे मोहम्मद समीर मोहम्मद आयास हा प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीकरिता घेऊन आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पथकाने कारवाई करून 13 हजार 800 रुपयांचा मांजा जप्त करून आरोपीला पुढील करवाईकरिता लोहारा पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.