ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी राज्यपालांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार अमरावती, दि. 10 : ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथील लोकभवनातील जय विहार येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि स्मृती चिन्ह असे गौरवाचे स्वरूप आहे. सत्कारावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाठारकर उपस्थित होते.