नाशिक: एकलहरे गंगावाडी शिवारामध्ये बिबट्याचा संचार, बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रे ठार
Nashik, Nashik | Aug 7, 2025 नाशिक शहराजवळील एकलहरे, सामनगाव, हिंगणवेढा, या शिवारामध्ये आज दि. 7 गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्याचा संचार असल्याने या बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले. दरम्यान एकूण दोन ते तीन बिबटे असून या बिबट्यांनी आज दिनांक ७ रोजी पहाटेचे सुमारास गंगावाडी रस्त्यावर बबन राजोळे यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे.