समुद्रपूर: युवानेते रोशन छत्रपती थुटे यांचा हिंगणघाट जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश
दिनांक ५ एप्रिलला ४ वाजता समुद्रपूर तालुक्यातील युवा नेतृत्व रोशन छत्रपती थुटे यांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यांचे वडील छत्रपती थुटे हे शिवसेनेचे माजी सभापती असून त्यांची ग्रामीण भागात मजबूत पकड आहे. रोशन यांच्या प्रवेशाने पक्षाचे काम जोमाने होईल असे मत वांदिले यांनी व्यक्त केले.