बेला पोलिसांनी खातखेडा शिवार परिसरात अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पाठलाग करून एक संशयास्पद आयसर वाहन पकडले.या कारवाईत पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवलेल्या ३८ गोवंश जनावरांची सुटका केली. आरोपी चालक वाहन सोडून पसार झाला असून, पोलिसांनी १५ लाख रुपयांचे वाहन आणि २.८२ लाख रुपये किमतीची जनावरे, असा एकूण १७.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.