आज गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी मुखेड येथील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे म्हणत आमदार डॉ.तुषार राठोड व उमेदवारास म्हटले कि आता लाडक्या बहिणींना लखपती दिदि करा