शेतात जात असताना शेतकऱ्याच्या दुचाकीला बसने धडक दिल्याची घटना आमगाव मौजा येथे दिनांक नऊ तारखेला दुपारी तीन ते सव्वातीन च्या दरम्यान घडली अजय विठोबा अंभोरे असे जखमीचे नाव आहे..यासंदर्भात फिर्यादी कविता अजय अंभोरे यांनी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल केली असता खरांगणा पोलिसांनी दिनांक 16 तारखेला एक वाजून 40 मिनिटांनी या घटनेची नोंद केली जखमेवर कस्तुरबा रुग्णालय येथे उपचार सुरू असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली