पेठ बीड हद्दीत डीवायएसपी पूजा पवार यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर कारवाई केली
Beed, Beed | Nov 20, 2025 डी वाय एस पी पूजा पवार यांच्या नेतृत्वाखाली पेठ बीड परिसरातील मटका जुगार व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धडक मोहीम राबवून तीन जुगार अड्यांवर एकाच वेळी छापे घालण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, वह्या, मोबाईल सेट, जुगार साहित्य अशा विविध वस्तू जप्त केल्या. सर्व अड्डयांवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.