सडक अर्जुनी: पाटेकुर्रा येथे आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन संपन्न; ग्रामपंचायतचा उपक्रम
पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या पाटेकुर्रा येथील ग्रामपंचायतने आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन केले. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पाटेकुर्रा येथे आयुष्मान भारत कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले, त्यात 105 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. ह्या कार्यक्रमामध्ये पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड बनवून देण्यात आले.