कन्नड: लोकशाहीचा उत्सव की तांत्रिक खेळ? —ईव्हीएम बिघाडावर नगराध्यक्ष उमेदवार फरिन जावेदांचा संतप्त सूर
कन्नड नगरपरिषद निवडणुकीत आज दि दोन डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली आणि मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली. या प्रकरणावर नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार फरिन जावेद यांनी प्रशासनावर गंभीर दुर्लक्षाचा आरोप केला. मतदारांच्या हक्काशी खेळ होत असल्याची टीका करत त्यांनी तत्काळ तांत्रिक तज्ज्ञांची व्यवस्था करण्याची मागणी केली.