बांद्रा पश्चिम येथील सोसायटीला स्थानिक आमदार आशीष शेलार यांनी दिली भेट
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ९८ मधील राम कृष्ण मिशन रोड येथील न्यू लाईट सोसायटीला आज शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजता भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. आशीष शेलार यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन आमदार शेलार यांनी दिले. यावेळी माजी नगरसेविका अलका केरकर आणि रहिवाशी उपस्थित होते.