शहापूर: शाकीय विश्रामगृहात मा. खा. हरीभाऊ राठोड यांची पत्रकार परिषद
Shahapur, Thane | Oct 19, 2025 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्यांना ज्या विभागात प्रशिक्षण दिले गेले त्याच विभागात नोकरी द्यावी अशी मागणी माजी खासदार तथा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. ते आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2च्या सुमारास ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.