आज दिनांक 22 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2वाजता जाफराबाद तालुक्यातील पिंपळगाव कड येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते खरीप हंगाम 2025 व 26 साठी सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे ,यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभी असून शेतकऱ्यांचा आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.