मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मंगळवार दि.16 डिसेंबर रोजी, दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी आत्महत्याग्रस्त विद्यार्थी शौर्य पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दोषी शिक्षकांवर तात्काळ कारवाई करावी आणि संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर दुपारी 2 वाजता दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केला. “ते काय चौथी पास आहेत का? त्यांना कळत नाही का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.या प्रकरणातील आरोपीला आ