रत्नागिरी: मारुती मंदिर येथे इलेक्ट्रिकल्स दुकानातून कामगारानेच ४ लाख ६७ हजार रुपयांची केली चोरी, लांजातील तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका इलेक्ट्रिकल दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाची तब्बल ४ लाख ६७ हजार रुपयाची रक्कम गहाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.