काल दि.२६ नोव्हेंबरला रात्री ७ वाजता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर मौजा अंतरंगाव वनतपासणी नाक्यावर नाकाबंदी करीत महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH३४ BZ ७६९१ ला थांबविण्यात आले. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये ७ गोवंशीय जनावर आढळले, त्या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंडून तेलंगणा राज्यात नेल्या जात होते.