माण: म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई; २३ सराईत गुन्हेगार तडीपार
Man, Satara | Nov 29, 2025 म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी म्हसवड पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवित २३ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. आगामी निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून मतदान प्रक्रियेच्या काळात शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीकरण होऊ नये यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता याबाबत माहिती दिली.