नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावंगा गुरव येथून शेतशिवारात उभी असलेली दुचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सावंगा गुरव येथील विजय दामोदर चव्हाण यांनी 24 डिसेंबरला रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे. अशी माहिती आज २५ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता पोलिसांनी दिली आहे..