नांदुरा: मामाच्या घरी जाते असे सांगून निघून गेलेली तरुणी बस स्थानक परिसरातून बेपत्ता
नांदुरा बस स्थानक परिसरातून अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४–६ वाजताच्या दरम्यान घडली. कु. सरोनी ऊर्फ अनुराधा संजय पातोंड वय १८ वर्ष असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. सदर तरुणी ही तिच्या वडिलांना मामाच्या घरी जाते असे सांगून निघून गेली बराच वेळ झाल्याने परत न आल्याने तिचा शोध घेण्यातआला.नातेवाईकांकडे व परिसरात विचारणा करण्यात आली परंतु मिळून न आल्याने नांदुरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली.