चाळीसगाव (प्रतिनिधी): नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. ३० आणि ३१ डिसेंबर अशा दोन दिवसांच्या कालावधीत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २४ तळीरामांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण १९२ वाहनधारकांकडून १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.