जिल्ह्यातील देवरी व चिचगड परिसरातील नागरिक शेतकरी व उद्योजकांना अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येवर आता ठोस आणि कायमस्वरूपी उपाय निघणार आहे आमदार डॉ.परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवरी येथे प्रस्तावित 132 के.व्ही.वीज उपकेंद्राच्या उभारणीस मंजुरी मिळाली असून या महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे देवरी तालुक्यातील देवरी चिचगड तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये दीर्घ काळापासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने पिण्याचा पाणी