शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरलेल्या भीमथडी जत्रेत गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला बचत गटाच्या जेवणाच्या स्टॉलमधून ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.‘जय बजरंगबली महिला बचत गट’ यांच्या स्टॉल क्रमांक ८४ वर दिवसभरातील व्यवसायातून जमा झालेली रक्कम स्टीलच्या डब्यासह चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे