हिंगणघाट वडनेर परीसरातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध सुंगधीत तंबाखू वाहतुक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई करीत तब्बल १ करोड ५४ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून एका कंटेनरवर अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पथकाने नाकाबंदी करून कारवाई केली आहे.