परळी: परळी नगरपरिषद निवडणूक अर्ज छाननी दरम्यान उमेदवार आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली
Parli, Beed | Nov 18, 2025 परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान आज अनपेक्षितपणे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अर्ज छाननी करताना काही मुद्द्यांवरून अधिकारी आणि काही उमेदवार यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही बाजूंमध्ये झालेली बाचाबाची इतकी वाढली की उपस्थितांना हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी लागली. निवडणुकीच्या पारदर्शक प्रक्रियेत असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, प्रशासनाकडून सर्व घटनांची नोंद घेतलेली आहे