वाशी: ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबास आ सावंत यांच्याकडून मदतीचा हात
सारोळा मांडवा (तालुका वाशी) — ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या करून गेलेल्या स्व. माणिक डोईफोडे यांच्या कुटुंबीयांना मंगळवारी आ.सावंत यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समक्ष २,५०,००० रुपये स्वखर्चाने धनादेश हस्तांतरीत केला गेला. या वेळी आ सावंत यांनी दूरध्वनीद्वारे कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि भविष्यात कौटुंबिक, शेती किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत पुढे कोणतीही अडचण आल्यास संपर्क करण्याचे आग्रहपूर्वक आवाहन केले.