जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून 11 आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.यावेळी डिएचओ डॉ. कैलाश शेळके, प्रभारी सी एस डॉ. विशाल पवार, डीआरसीएचओ डॉ. सतीश रुणवाल, डॉ. पांडूरंग फोपसे, डॉ प्रकाश जाधव डिपीएम शंकर तावडे उपस्थित