कन्नड: आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून आशा सेविकांसाठी ‘आशा’ चित्रपटाचा विशेष शो
कन्नड तालुक्यातील सर्व आशा सेविकांसाठी त्यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘आशा’ हा मराठी चित्रपट कन्नड येथील अंजलि रत्नदिप सिनेप्लेक्स येथे विशेषतः दाखवण्यात आला.हा उपक्रम आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.चित्रपटातून समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांचे मोलाचे योगदान प्रभावीपणे उलगडले.त्यांची जिद्द, सेवा आणि त्याग यांचे भावस्पर्शी चित्रण उपस्थितांना भावूक करून गेले