हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे नितेश कराळे यांच्या विरोधात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू संतांवर टीका केल्या बद्दल आणि हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल विहिप तर्फे दखलपात्र गुन्हा दाखल करावा अश्या प्रकारचे निवेदन पोलीस स्टेशन हिंगणघाट ला देण्यात आले. नितेश कराळे हे शिक्षक पेशात असून सुद्धा नेहमी हिंदू धर्माबद्दल, हिंदू साधू संताबद्दल,हिंदू पारंपरिक सणाबद्दल नेहमी चुकीचे विधान करत असतात आणि यांचा स्वतः एकच धंदा की स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवणे असे निवेदनात नमूद केले