वर्धा जिल्ह्यातील शिरसगावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील अनेक महिन्यांपासून गावातील नाल्या उपसल्या गेल्या नाहीत. गावात नियमित कचरा उचलला जात नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा साचलेला आहे. तसेच नाल्या साफ न केल्यामुळे पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली असून, नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे मात्र ग्रामपंचायतची दुर्लक्ष दिसत आहे. या