एक भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन टिप्पर ट्रकला मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एका दुचाकीवर तीन तरुण स्वार होते. ते जामसावळी येथून दर्शन घेऊन उमरेडकडे परतत होते. दुचाकीचा चालक अत्यंत वेगाने वाहन चालवत होता.