कळमनूरी: डोंगराळे मालेगाव येथील घटनेचा आ. बाळापूर शहरात सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने निषेध,पोलीस ठाण्याला दिले निवेदन
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील चार वर्षाच्या चिमुकलीवर त्याच गावातील एका नराधमाने लैंगिक अत्याचार करून अमानुष हत्या केली, या घटनेचा आज दि.22 नोव्हेंबर रोजी आ.बाळापूर शहरात सराफा व सुवर्णकार असोसिएशन च्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून जाहीर निषेध केला आहे ' यावेळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याला निवेदन देऊन सदर आरोपीला तात्काळ फाशी देण्यात येऊन चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन दिले आहे .