आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार शेलार यांच्या उपस्थितीत एच/पश्चिम वॉर्ड कार्यालयात बैठक
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता वाजता महापालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत एच/पश्चिम वॉर्ड कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण विषय आणि समस्या निदर्शनास आणून दिल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच उत्सवादरम्यान होणाऱ्या ट्रॅफिकच्या अडचणीवर चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.