दारव्हा: बोरी अरब ग्रामपंचायतीला सदस्यांनी ठोकले कुलूप!
दारव्हा तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या बोरी अरब ग्रामपंचायतीवर आज (28 नोव्हेंबर) सकाळीच सदस्यांनी कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला. विकासकामे रखडणे, शहरातील अस्वच्छता वाढणे, नालेसफाई न होणे, वीज सुविधा नसणे आणि वारंवार सांगूनही मासिक सभा न घेणे—या सर्व निष्काळजीपणाविरोधात सदस्यांनी थेट कारवाईचा मार्ग अवलंबला.