बाभूळगाव: अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,वेणी नायगाव मार्गावरील घटना
अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वेणी नायगाव मार्गावर घडली.प्रशांत घोडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.प्रशांत घोडे हे भाऊ नामदेव घोडे यांच्यासोबत दुचाकीने जात असताना वेनी नायगाव रस्त्यावर समोरून येत असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रशांत घोडे यांचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने त्यांचे भाऊ नामदेव घोडे अपघातामध्ये बचावले.