भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार जयश्री बोरकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजप नेत्यांच्या 'विजयी आकड्यां'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांचे किती उमेदवार निवडून येणार आहेत हे आधीच कसे माहिती असते?" असा सवाल विचारत त्यांनी निवडणूक निकालांच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली.