हिंगोलीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाच्या आणखी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. काही उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा सुनावणीच्या अनुषंगाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली होती.