माजलगाव: माजलगाव तेलगाव महामार्गावर पाथरूड जवळ स्कॉर्पिओ गाडी आणि उसाचे ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला
माजलगाव-तेलगाव महामार्गावरील पाथरूडजवळ आज सकाळी उसाचा ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला एमएच 23 एडी 4268 क्रमांकाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. ट्रॅक्टरला आवश्यक ते रिफ्लेक्टर नसल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला ट्रॅक्टर वेळेत दिसला नाही आणि हा गंभीर अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. अपघातात स्कॉर्पिओचालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले