पोलादपूर तालुका, कापडे विभागातील मौजे कापडे खुर्द येथील चोरगेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या साकवाच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चोरगेवाडी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची ही महत्त्वाची मागणी होती. प्रतापगडाच्या पायथ्यापासून येणाऱ्या नदीला पावसाळ्यात पूर आल्यावर गावातील दळणवळण पूर्णपणे खंडित होत असे. साकवाच्या बांधकामामुळे आता सुरक्षित व सुलभ दळणवळण उपलब्ध होणार असून, विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या प्रसंगी तालुक्यातील तसेच कापडे विभागातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.