गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 2 टिप्पर महसूल विभागाच्या पकडल्याची घटना घडली याबाबत चे वृत्त असे की महसूल विभागाचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहिती च्या आधारे वाहनांची तपासणी केली असता 2 टिप्पर मध्ये रेती आढळून आली. त्यावरून कागदपत्रे तपासणी केली असता अवैधरित्या रेती वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात येऊन सुरक्षेच्या दृष्टीने मौदा पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला.