वडवणी तालुक्यातील चिंचवण ग्रामीण रुग्णालयात, गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता एड्स जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने एड्स प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. संक्रमण कशामुळे होते, त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच उपलब्ध वैद्यकीय सेवा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक नागरिक, रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत उपस्थिती लावली. कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरक्षित वर्तन, नियमित तपासणीचे महत्त्व आणि समाजातील गैर