नारंगी (ता. अलिबाग) येथे आगरी समाज संस्था अलिबाग व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले. या उपक्रमात संस्थेच्या वतीने फणस, आवळा, कोकम, सिताफळ, मावा फळ, लिंबू, स्टार फ्रूट अशा एकूण ५० फळझाडांची रोपे भेट देण्यात आली. ग्रामपंचायत नारंगीचे सरपंच श्री. उदय म्हात्रे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या फळरोपवाटिकेमध्ये आतापर्यंत एकूण १८८ झाडांची लागवड पूर्ण झाली आहे.