महाबळेश्वर: प्रतापगड येथे शिवप्रतापदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला
सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे शिवप्रतापदिन दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या जयघोषात तुताऱ्यांच्या निनादात छ. शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवकालीन धाडसी खेळ सादर करण्यात आले.