पन्हाळा: पन्हाळा तालुक्यात उन्हाळी भात, सूर्यफूल,भुईमूग,नाचणी,मका पिकांना पावसाचा फटका #Jansamasya
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून दररोज पडत असलेल्या मान्सूनपुर्व पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. उन्हाळी कापणीस आलेली पिके पावसाने भिजून कुजू लागली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग,नाचणी,मका आदी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील दहा-बारा दिवसांपासून सलग रिपरिप पावसामुळे शेतकरी कापणी करायची की नाही या संभ्रमात अडकले आहेत.