कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेत तरुणांची फसवणूक : माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र त्याची प्रवेश फी भरमसाठ आहे, ती तरुणांना परवडणारी नाही. त्यामुळे तरुणांची ही फसवणूक असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. जिल्हा बँकेने ठरविले असते तर ही भरती प्रक्रिया अधिक सुटसुटीत झाली असती, असे ते म्हणाले.