पारोळा येथील बालाजी विद्याप्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयास जळगाव जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती स्वाती हवेले यांनी अचानक भेट दिली.या भेटीत त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच वाचन लेखन,निपुण चाचणी,शाळेत राबवले जाणारे उपक्रमाची पाहणी केली.२६ जानेवारीची संगीत कवायतची तयारी बघितली.