स्वामी विवेकानंद व मा जिजाऊंच्या जयंती निमित्ताने फ्रीडम युथ फाऊंडेशन साकोलीतर्फे चला ट्रेकिंग करूया उपक्रमाचे आयोजन साकोलीतील प्रगती कॉलनीतील श्रीराम चौकातून निसर्गरम्य पहाडीवर रविवार दि11ला सकाळी 9ला केले.नगराध्यक्षा देवश्री कापगतेंनी उपक्रमाचे उद्घाटन केले.500पेक्षाही अधिक लहानथोरांनी निसर्गसम्य पहाडी चढण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला.स्पर्धेतील हर्ष करंजेकरला प्रथम क्रमांकाची रेंजर सायकल मिळाली.किशोर बावणे,अल्फेज खान कार्तिक लांजेवार, प्रविण कांबळे, संगीता खूणे यांनी सहकार्य केले