विदर्भाचे 'भाताचे कोठार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सुरुवातीला झालेल्या विलंबामुळे आता खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे. जिल्ह्यातील विविध आधारभूत धान खरेदी केंद्राबाहेर धान भरलेले ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, शेतकरी आपला माल विकण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करत आहेत. यावर्षी प्रशासकीय स्तरावर धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्यास काहीसा विलंब झाला.