यवतमाळ शहरातील दाते कॉलेज परिसरामध्ये राहणारे आशिष काळे हे आठवडी बाजारामध्ये काही साहित्य खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांच्या जवळचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केला तसेच यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्टेट बँकेतील बचत खात्यातून 81 हजार रुपये लांबविले. याप्रकरणी आशिष काळे यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास जारी केला आहे.