हवेली: लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडर लिक झाल्याने घरात स्फोट झाल्याची घटना घडली
Haveli, Pune | Dec 1, 2025 लोणी काळभोर येथे घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे. तर स्फोटमुळे घरातील खिडकी तुटून खाली रस्त्यावर पडल्याने दुचाकीवरून चाललेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत घडली आहे.